लाच घेताना कर अधिकारी रंगेहात पकडला


। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । व्यवसायास व्हीऐटी करापोटी परतावा मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना अहमदनगर येथील राज्य कर अधिकारी रमेश अमृता बुधवंत (वय 57, वर्षे, व्यवसाय नोकरी, कर अधिकारी, (राजपत्रित गट-ब) नेमणूक -कर व सेवा कर भवन, नगर, रा.खराडी, पुणे) यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबधंक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

माहिती अशी की, तक्रारदार यांचा मोबाईल फोन व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे वितरणाचा व्यवसाय असून तक्रारदार यांच्याकडून त्यांचे व्यवसायातील उलाढाली संबंधाने  विक्रीकर ताळेबंद सादर करताना काही त्रुटी आढळल्याने तक्रारदार यांना वाढीव कर भरणा करण्याबाबत नोटीस अदा केली होती.

सदरची नोटीस निरस्त करणे तसेच तक्रारदार यांचा व्हीऐटी करापोटी परतावा मिळवून देण्याकरिता मदत करण्यासाठी अधिकार्‍याने तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 50 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 35 हजार रुपये रक्कम घेण्याचे ठरवून लाचेचा पहिला हप्ता रुपये 20 हजार रुपये लाचेची रक्कम त्यांचे कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, वाचक पोलीस उप अधिक्षक सतीश डी.भामरे, यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबधंक नाशिक विभागाचे पोलिस उप अधीक्षक अभिषेक पाटील, पो.हवा. सुकदेव मुरकुटे, पो.ना.मनोज पाटील यांनी केली.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
*अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक.
* टोल फ्रि क्रं. 1064

Post a Comment

Previous Post Next Post