। अहमदनगर । दि.17 फेब्रुवारी । अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाची न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील कुमारी श्रेया अशोक सागडे टी वाय बी कॉम या
वर्गातील हिची, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात ग्वालियर मध्य प्रदेश येथे होणाऱ्या लॉन टेनिस स्पर्धेसाठी पुणे विद्यापीठ संघात निवड झालीआहे.लॉन टेनिस या खेळात निवड होणारी कुमारी श्रेया महाविद्यालयाची पहिली विद्यापीठ खेळाडू आहे.
नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या विभागीय लॉन टेनिस स्पर्धेत श्रेयाने अनुक्रमे पुणे शहर, पुणे जिल्हा, नाशिक या तीनही विभागातील खेळाडूंना पराभूत करत प्रथम सुवर्णपदकाची कामगिरी केली, सध्या श्रेया लॉन टेनिस या खेळाचा दररोज सराव करत असून पुढील होणा-या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याची खात्री आहे.
या यशाचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे,सचिव जे.डी. खानदेशे, सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ.विवेक भापकर, संस्थेचे सर्व विश्वस्त सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एच झावरे, उपप्राचार्य कला शाखा डॉ.बाळासाहेब सागडे,वाणिज्य शाखा डॉ. संजय कळमकर, विज्ञान शाखा डॉ.अनिल आठरे, प्रबंधक बबन साबळे,अधिक्षक श्री पी. सी. म्हस्के,
आर एम.पाटील,तसेच महाविद्यालयातील सर्व विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले,आणि पुढील स्पर्धेसाठी श्रेया सागडे हिस शुभेच्छा दिल्या. श्रेया हिस जिमखाना विभागाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद मगर, प्रा. धन्यकुमार हराळ, प्रा. धनंजय लाटे, प्रा.सुधाकर सुंबे, प्रा.आकाश नढे, डॉ. अशोक सागडे या सर्वांचे मार्गदर्शन लाभले आहे.