। नवी दिल्ली । दि.17 फेब्रुवारी । लहान मुलांच्या सुरक्षित रस्ते प्रवासासाठी केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यानुसार ९ महिने ते ४ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीही हेल्मेट सक्तीचे केले आहे. त्याबाबतची अधिसूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने बुधवारी जारी केली.
लहान मुलांना रस्त्याने सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी केंद्र सरकारने दुचाकीवरील प्रवासासाठी काही नियम केले आहेत. त्यासाठी मोटार वाहन कायदा १९८९ च्या कलम १३८ मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार ९ महिने ते ४ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हेल्मेट सक्तीचे केले आहे.
याशिवाय मुलांना दुचाकीवरून योग्य प्रवास करता यावा यासाठी सेफ्टी हर्नेसचा वापर करणे आवश्यक आहे. हा बेल्ट ३० किलो वजन पेलणारा हवा. याशिवाय दुचाकीचा वेग ताशी ४० किलोमीटर पेक्षा अधिक ठेवता येणार नाही, असे सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
Tags:
Maharashtra