। मुंबई । दि.18 फेब्रुवारी । केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद आणि आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने राणे यांना नोटीस बजावली आहे. राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले आहे का ? याची पालिका तपासणी करणार आहे.
त्यासाठी पालिकेच्याकेच्या वेस्ट विभागाने बंगल्यात जाऊन छायाचित्र आणि मेजरमेंट घेण्यासाठी येणार असल्याचे नोटीसद्वारे कळविले आहे. त्यावेळी बंगल्यासाठीचे मंजूर केलेले प्लान आणि अधिकृत कागदपत्रे घेऊन हजर राहण्यास सांगितले आहे. यामुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होणार आहेत.
पालिकेची नोटीस राणेंच्या बंगल्याला पालिकेची नोटीस-मुंबई महापालिकेच्या के-पश्चिम वॉर्ड (अंधेरी पश्चिम) च्या पदसिद्ध अधिकार्याने स्वाक्षरी केलेली एक नोटीस गुरुवारी मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये मालक कब्जेदाराला म्हणजेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जारी करण्यात आली आहे.
Tags:
Breaking