प्रमोद तांबे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी


। अहमदनगर । दि.24
फेब्रुवारी ।  पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर येथील सहाय्यक प्राध्यापक प्रमोद राजेंद्र तांबे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (Ph.D.)   पदवी जाहीर झाली. त्यांचा प्रबंधाचा विषय शरद पवार यांच्या कृषी धोरणांचा चिकित्सक अभ्यास हा होता.

पेमराज सारडा महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. श्री. शरद पवार   केंद्रीय कृषिमंत्री (2004-2014) असताना शेतकर्‍यांसाठी चे राष्ट्रीय कृषी धोरण- 2007 जाहीर केले याचा व राष्ट्रीय कृषी धोरण- 2000 यांचा तुलनात्मक अभ्यास, विश्लेषण तसेच स्वातंत्र्यानंतरच्या कृषी धोरणांचा आढावा या संशोधनामध्ये  घेतला आहे.

यांची तोंडी  परीक्षा (Viva)  ऑनलाईन पद्धतीने पार पडली यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. मंगेश कुलकर्णी अध्यक्ष व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. श्याम कदम बाह्य  परीक्षक म्हणून उपस्थित होते.

हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, मानद सचिव संजय जोशी, प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, संशोधन केंद्र समन्वयक डॉ.ज्योती बिडलान यांनी व पेमराज सारडा महाविद्यालयात सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post