मततादीदींचा शरद पवार यांना फोन....आम्ही आपल्या बरोबर

। मुंबई  । दि.23 फेब्रुवारी । आज राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणाचा आरोप ठेवून कारवाई करण्यात आली आहे. मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. मलिक यांच्या अटकेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांना फोन केला आहे. ईडीच्या या कारवाईविरोधात आपण राष्ट्रवादीसोबत असल्याचे ममतादीदींनी म्हंटले आहे.

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. ईडीच्या या कारवाईविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

शरद पवार यांनी सर्व नेत्यांच्या बैठक घेतली. याच दरम्यान, तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांना फोन केला.

दोन्ही नेत्यामध्ये जवळपास पाच मिनिटं चर्चा झाली आहे. यावेळी ईडीने केलेल्या कारवाईचा ममतादीदींनी विरोध दर्शवला आहे. या लढाईत आपण सोबत असल्याचे ममतादीदींनी शरद पवारांना सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post