महाविकास आघाडीच्या वतीने उद्या शनिवार दि.२६ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन

राज्याचे मंत्री ना.नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ 

महाविकास आघाडीच्या वतीने उद्या शनिवार दि.२६ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन


। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री ना.नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दि.२६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, माळीवाडा बसस्थानक, अहमदनगर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात ज्या सूडबुद्धीने केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातोय त्याविरोधात राज्यात आणि देशात जनभावना तीव्र आहे. मंत्री ना.नवाब मलिक त्यांच्यावर झालेली कारवाई केवळ ते केंद्र सरकारविरोधात बोलत असल्यामुळे होत आहे. यासाठी मंत्री नवाब मलिक यांचा आतंकवादाशी संबंध लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे,

ईडी, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणा ज्याप्रकारे काम करत आहेत, या सर्व कारवाई सुडाच्या भावनेतूनच होत असल्याचे महाविकास आघाडी सरकारने या भूमिकेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तीनही घटक पक्षांच्यावतीने शनिवार दि.२६ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, माळीवाडा बसस्थानक, अहमदनगर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post