परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सी चालकांना इशारा

 

। मुंबई । दि.21 एप्रिल 2026 । “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर मराठी बोलता आलीच पाहिजे. मी मराठी शिकणार नाही, अशी मुजोरी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” अशा कडक शब्दांत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व अमराठी प्रवासी वाहनचालकांना इशारा दिला आहे. 
 
ज्या वाहनचालकांना मराठी येत नाही, त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा ‘खणखणीत’ इशारा त्यांनी नुकताच दिला.
 
परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील रिक्षा, टॅक्सी आणि इतर सर्व प्रवासी वाहनांच्या चालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ मे (महाराष्ट्र दिन) पासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post