। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात एका धावत्या ट्रकला आग लागली. त्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका होत्या. त्या जळून खाक झाल्या आहेत.
यावर भाष्य करताना माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संशय व्यक्त केला आहे. दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका घेवून जाणार्या टेम्पोला लागलेल्या आगीची घटना अतिशय गंभीर असून प्रश्नपत्रिका जळाल्या की जाळल्या, असा सवाल त्यांनी केला आहे.
तसेच या प्रकरणी त्यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भरती प्रक्रियेसाठी कोणतीही परिक्षा पारदर्शकपणे होवू शकलेली नाही. सर्वच परिक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार वारंवार घडल्याने या सरकारच्या काळात सर्वच परिक्षा संशयाच्या भवर्यात अडकल्या असल्याची टीका त्यांनी केली.
Tags:
Breaking