रुपाली चाकणकर यांचा ‘त्या’ पदाचाही राजीनामा!

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा!


। मुंबई । दि.28 मार्च 2026 । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे मोठी घडामोड उडाली आहे. अशोक खरातसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी आधीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.  तर  आता चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर आता चाकनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रे्रस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनमा दिल्याची माहिती समोर येत आहे.


रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत माहिती देताना म्हटले आहे की, ’खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही,आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे.


’सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा. पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.’ असे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post