ईडी कोठडीत असलेल्या मंत्री मलिकांची प्रकृती बिघडली...



 । मुंबई । दि.24 फेब्रुवारी । राज्याचे अल्पसंख्याक मंत्री  नवाब मलिक यांना ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर अटक केली. न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्च पर्यंत ईडी कस्टडी सुनावली आहे.

ईडीच्या कस्टडीत असताना नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणले आहे. मात्र, त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात  राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे सध्या ईडीच्या कस्टडीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post