। अहमदनगर-राहुरी । दि.17 फेब्रुवारी । जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्याच्या ११ गावातील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होतील अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. या पाणीपुरवठा योजनांसाठी ७ कोटी ८२ लाख ९१ हजार ६४७ रुपये खर्च येणार आहे.
यामध्ये तालुक्यातील तमनर आखाडा ३० लाख ५९ हजार रुपये, केंदळ बुद्रुक ५३ लाख ४८ हजार रूपये, आरडगाव ७९ लाख ९५ हजार रूपये, कोंढवड ७२ लाख ३२ हजार रूपये, केंदळ खुर्द ६५ लाख ३७ हजार रूपये, रामपूर ३० लाख २४ हजार रूपये, तांदुळनेर ९८ लाख ३२ हजार रूपये, वाघाचा आखाडा १ कोटी १७ लाख ४७ हजार रूपये,
डिग्रस ५९ लाख ८९ हजार रूपये, चिंचाळे ९९ लाख ३५ हजार रूपये, मोमीन आखाडा ७८ लाख ८९ हजार रूपये खर्च होणार आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत असलेली ही योजना पूर्ण झाल्यानंतर राहुरी तालुक्यात घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार असल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.