। अहमदनगर । दि.18 फेब्रुवारी । श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा डिप्लोमा इन फार्मास्युटिकल सायन्सेस च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी ऋतुजा अशोक मांढरे हिने राज्य पातळीवरील पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याची माहिती प्राचार्य रमेश शिंदे यांनी दिली.
श्रीगणपती एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, टेंभुर्णी यांनी राज्य पातळीवरील पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा घेतली. यामध्ये राज्यभरातून अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये परिक्रमाच्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवल्याचा अभिमान असल्याचे गौरोवोद्गार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह पाचपुते यांनी काढले. स्पर्धेची तयारी करून घेण्यात प्रा.नेहा गरुड यांनी मोलाची भूमिका बजावली.
Tags:
Ahmednagar