। सिंधूदुर्ग । दि.09 फेबु्रवारी । भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना अखेर कोर्टानं जामीन मंजूर केलाय. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणेंची तब्येतही खालवली आहे. आज सकाळी तर त्यांना उलट्याचा त्रास होत असल्याचीही माहिती आली होती.
त्यापार्श्वभूमीवर नितेश राणेंसाठी आणि एकूणच राणे कुटुंबियांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. नितेश राणे यांना संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि शेवटी ते सेशन्स कोर्टापर्यंत आलं.
अनेक राजकीय तसच कोर्टातल्या घडामोडीनंतर नितेश राणेंना जामीन मंजूर केला गेला आहे. नितेश राणे यांना जामीन मंजूर करताना कोर्टाने काही अटीशर्ती घातल्या आहेत. नितेश राणे यांना चार्जशीट दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर तपासात कुठलाही हस्तक्षेप करू नये असे आदेशही कोर्टाने त्यांना दिले आहेत.
नितेश राणे यांना जामीन मजूर झाल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसनेवर आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं अशा आशयाचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
Tags:
Breaking