प्रभाग ९ मधील कार्यकर्त्यांनी किरण काळेंच्या नेतृत्वाखाली खांद्यावर घेतला काँग्रेसचा झेंडा ;
प्रभागातील चारही नगरसेवक काँग्रेसचे करायचेत, कामाला लागा... : काळे
। अहमदनगर । दि.01 फेबु्वारी । : नुकत्याच प्रभाग ९ मध्ये रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली. ही पोटनिवडणूक अनेक अर्थाने गाजली. अनेक राजकीय नाट्य यामध्ये पाहायला मिळाले. या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते घेत निकालावर परिणाम करणाऱ्या मनसे उमेदवार पोपट पाथरे यांना मोठ्या संख्येने मते मिळवून देणाऱ्या फिल्ड वरील कार्यकर्त्यांनी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
हे देखील वाचा......फिनेल पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न
प्रशांत जाधव, बिभीषण चव्हाण यांच्यासह डॉ. राहुल पवार, दत्तात्रय माणिकजडे, गौरव घोरपडे, बाळकृष्ण कोंडके, दीपक नवघरे, अनिल शिरसागर, जेष्ठ महीला कार्यकर्त्या झुंबरबाई जाधव, गौरव घोरपडे, अविनाश पाटील, सागर पोळ, सखाराम कोथंबिरे, ॲड. पी.व्ही. तांदळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ओबीसी काँग्रेसचे प्रभारी डॉ. जगदीशदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये किरण काळे यांनी जाधव, चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिला.
हे देखील वाचा......शाळा सुरु करण्याचा निर्णय आपत्तिव्यवस्थापनाच्या बैठकीनंतर होणार
यावेळी ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, मनपा माजी विरोधी पक्ष नेता दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक समाजाचे नेते शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चूडीवाला, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, राणीताई पंडित, जुबेर सय्यद, इंटक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ शेख, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, कृषीरत्न दिनेश पाटील, राजेंद्र जाधव, निलेश भालेराव, निखिल चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. दशरथ शिंदे, अनंतराव गारदे यांच्या पुढाकारातून हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
हे देखील वाचा......राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन
पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचा उमेदवार देण्यात आला होता. त्या उमेदवाराचा भाजप उमेदवाराने पराभव केला. काँग्रेस उमेदवार रिंगणात नव्हता. मात्र प्रचारामध्ये काँग्रेस नेत्यांचे फोटो डावलल्यामुळे मोठे वादंग उभे राहिले होते. काँग्रेसला डावलल्यामुळेच महा विकास आघाडी उमेदवाराचा पराभव झाल्याचा दावा काँग्रेसच्या मंथन बैठकीत करण्यात आला होता. तसेच राष्ट्रवादी आमदाराने भाजप उमेदवाराचा सत्कार केल्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला आतून छुपा पाठिंबा दिला असल्याचा आरोप देखील काँग्रेसच्या वतीने करण्यात आला होता.
चारही नगरसेवक काँग्रेसचे करायचेत, कामाला लागा... : काळे
प्रशांत जाधव, बिभीषण चव्हाण यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केल्यानंतर काळे यांनी उपस्थित प्रभाग ९ मधील कार्यकर्त्यांना आवाहन केले की, तुम्ही कामाला लागा. मनपा सार्वत्रिक निवडणुक अवघ्या दोन वर्षावर आली आहे. प्रभाग ९ मध्ये चारही नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून आणायचे आहेत. आगामी काळात काँग्रेस पक्षाशी आणि ना. बाळासाहेब थोरात यांच्याशी शतप्रतिशत प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्यालाच उमेदवाऱ्या दिल्या जातील. ना.थोरात यांनी अनेक वर्ष ज्यांना जीव लावला, ज्यांना राजकीय बळ देत ज्यांच राजकीय करियर घडवलं. तेच थोरात यांच्यावर उलटले. याचा हिशोब जनता योग्य वेळी करेल. चार घरच्या पाहुण्यांना काँगेसच्या दारात उभे केले जाणार नाही. प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल असे काळे यांनी जाहीर केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी याला जोरदार टाळ्या वाजवत अनुमोदन दिले.