बजेटची ओपनिंग धडाकेबाज घोषणांनी!


।  नवी दिल्ली । दि.01 फेबु्वारी । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी बरोब्बर 11 वाजता केंद्रीय अर्थसंकल्प  सादर करायला सुरुवात केली. तब्बल 60 लाख नव्या नोकऱ्या, 400 नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी त्यांनी बजेटची ओपनिंग केली.

हे देखील वाचा...नगर, पारनेर आणि श्रीगोंद्याच्या दुष्काळी भागात पाणी आणण्यासाठी लोकचळवळ उभी राहण्याची गरज : जगन्नाथ भोर

बजेटमधील ठळक मुद्दे खालील प्रमाणे-

💧 कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर

💧 पंतप्रधान आवास योजनेतून ८० लाख घरे देणार

💧 खासगी नेटवर्क प्रोव्हायडरच्या सहकार्यानं 5जी सेवा सुरु करणार

💧 एलआयसीचा लवकरच आयपीओ आणणार

💧 पंतप्रधान गती शक्ती योजनेमुळे मोठी गुंतवणूक

💧 ई-पासपोर्ट सुविधा अधिक सुलभ करणार

💧 यापुढे चिप असलेले पासपोर्ट मिळणार

💧 शेतकऱ्यांकडून एमएसपीवरच शेतमालाची खरेदी करणार.

💧 पैशांची देवाण-घेवाण सोयीचे होण्याकरता प्रयत्न करणार

💧 पोस्ट ऑफिस बँकांशी जोडणार

💧 प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार, ३.८ कोटी घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा पोहोचवण्याचा प्रयत्न. नळ योजनेसाठी ६० हजार कोटी खर्च करणार

💧 रसायनमुक्त शेतीला प्राधान्य देणार

💧 रेल्वे, रस्ते, हवाई वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक करणार

💧 देशात २५ हजार किमी रस्त्याचं जाळं उभारणार

💧 ई-वाहनांसाठी मोठी योजना राबवणार

💧 शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेल आणणर, स्थानिक भाषेत शिकवणार

💧 स्टार्टअपसाठी नाबार्डच्या माध्यमातून

💧 देशात डिजिटल विद्यापीठ उभारणार

💧 विद्यार्थ्यांना रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून डिजिटल शिक्षण देणार

💧 वन स्टेशन वन प्रोडक्ट योजना आणणार

💧 छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होणार आहे

💧 पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार

💧 रेल्वेचं जाळं विकसित करणार

💧 मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न करणार

💧 मेट्रोचं जाळं प्राधान्यानं विकसित करणार

💧 2022-2023 मध्ये आठ ठिकाणी रोप वे सुरु करणार

💧 रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरणार

💧 नागरिकांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल यासाठी प्रयत्न करणार

💧 गेल्या अर्थसंकल्पात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवला

💧 कोरोनाच्या काळात आरोग्यावर भर देण्यात आला

💧 आत्मनिर्भर भारताला मोठा प्रतिसाद मिळाला

💧 30 लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी प्रयत्न

💧 बँकाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहोत

निर्मला सितारमण यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात

Post a Comment

Previous Post Next Post