शाळा सुरु करण्याचा निर्णय आपत्तिव्यवस्थापनाच्या बैठकीनंतर होणार


। अहमदनगर । दि.31 जानेवारी । जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात पुढील आठवड्यात निर्णय अपेक्षित असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत आपत्तिव्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे.

राज्य सरकारने शाळा सुरु करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला स्थानिक पातळीवर कोरोना परिस्थिती पाहून पाहून शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासानाला अधिकार दिले आहेत.

नगर जिल्हयात कोरोना पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याकारणाने पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय आठवडाभर लांबणीवर टाकला होता.

त्यानुसार आता पुढील आठवड्यात आपत्तिव्यवस्थापन समितीची पुन्हा बैठक होनार असून, त्यात कोरोना परस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.

पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असल्यास त्यानुसार शाळा सुरु करण्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. मंगळवारी अथवा बुधवारी समितीची बैठक होऊन त्यात शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post