चंबळ नदीत कार कोसळली, 9 जणांचा मृत्यू

। कोटा । दि.20 फेब्रुवारी ।  शहरातील चंबळ नदीच्या छोट्या पुलावर मोठा अपघात झाला आहे. या अपघात आज सकाळी वरातीची कार चंबळ नदीत पडली. ज्यामध्ये नवदेवाचा समावेश होता. यामध्ये नवदेवासह 9 जणांचा मृत्यू झाला आहे  ही गाडी पडताना कोणी पाहिली नाही. 

तेथून जाणाऱ्या लोकांनी कार पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडून महापालिकेच्या बचाव पथकाला माहिती मिळाली आहे. त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

बचावकार्यात 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामधील सर्वांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला आहे. कार नदीत कशी पडली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी सर्व व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेऊन एमबीएस रुग्णालयाच्या शवागारात हलवले आहेत. 

महापालिकेचे डायव्हर विष्णू शृंगी आणि चालक सुरेश मंडावत यांनी सांगितले की, वरात चौथ का बरवडा ते उज्जैनकडे निघाली होती. पहाटे ५ वाजता हॉटेलमध्ये चहा पिताना हे लोक आपल्या कुटुंबीयांशी बोलले होते. त्यानंतर अपघाताचे घटना समोर येत आहे.

हे लोक केशोराई पाटण मार्गे बुंदी रस्त्यावरून कोटा शहरात दाखल झाले होते. ते चंबळच्या रियासत कालीन बिना मुंडेरच्या छोट्या पुलावरुन जात होते. अशाक गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी पाण्यात कोसळली. नवरदेवाचे नाव अविनाश बाल्मिकी असल्याचे समोर येत आहे. 

अशा स्थितीत सकाळी एका व्यक्तीने कार पाण्यात पाहिल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बचावकार्य सुरू झाले. पोलिसांनी वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे आता वरात माघारी परतली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post