म्हासणे फाटा येथील घरफोडीत दागिन्यांसह रोकड पळविली

। अहमदनगर । दि.11 जानेवारी । बंद घराची खिडकी उचकटून अज्ञात चोराने आत प्रवेश केला. आतील सामानाची उचका पाचक करून सामान अस्ताव्यस्त फेकले. बेडरुम मधील कपाटाचे लॉकर तोडून आतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 56 हजार 250 रूपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. 

ही घटना पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथे घडली. या प्रकरणी सुपा पोलिसांनी सुनील शंकर नगरे ( वय 41 राहणार म्हसणे फाटा तालुका पारनेर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कायदा कलम 457, 380 अन्वये घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार ओहोळ करीतआहे.

Post a Comment

Previous Post Next Post