। अहमदनगर । दि.11 जानेवारी । गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली आहे. गुन्हा दाखल होण्यासाठी ऋषिकेश वसंत शेटे यांनी ही खासगी फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना अहवाल मागितला असून प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जानेवारी रोजी होणार आहे. नगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी अर्ज नंबर 1157/2021 द्वारे भादंवि कलम 302, 120 ब,201 व 34 प्रमाणे शंकरराव यशवंतराव गडाख व सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरुद्ध फौजदारी दंड संहिता कलम 156/3 प्रमाणे गुन्हा दाखल होण्यासाठी ऋषिकेश वसंत शेटे यांनी खासगी फिर्याद दाखल केली आहे.
या फिर्यादीवर 23 डिसेंबर 2021 रोजी न्यायालयाने तपासी अधिकारी तोफखाना पोलीस ठाणे यांचा अहवाल मागितला होता. प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.