राजमाता जिजाऊंचे विस्तीर्ण जागेत भव्य स्मारक उभारावे : किरण काळे

जिजाऊ जयंती निमित्त काँग्रेसच्या वतीने अभिवादन  


। अहमदनगर । दि.12 जानेवारी । समाजामध्ये अनागोंदी माजलेली असताना जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष घडविला. जिजाऊंच्या शिकवणीमुळेच छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होऊ शकले. राजमाता जिजाऊंचे नगर शहरात विस्तीर्ण जागेत भव्य स्मारक शासनाने उभारावे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

जिजाऊ जयंतीनिमित्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर वस्तुसंग्रहालयातील जिजाऊंच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केले. यावेळी शहाजीराजे भोसले यांच्या पुतळ्यास देखील हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, खलील सय्यद,  अनिसभाई चुडीवाल, 

शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, प्रवीण गीते, अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष अज्जूभाई शेख, अजय मिसाळ, खजिनदार मोहन वाखुरे, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत राणीताई पंडित, सेवादल महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, अर्चना पाटोळे, निर्मला कोरडे, रिजवाना शेख आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किरण काळे यावेळी म्हणाले की, भोसले परिवाराचा आणि नगर शहराचा ऐतिहासिक संबंध राहिलेला आहे. शहा शरीफ दर्गाशी या परिवाराची नाळ जोडलेली होती. राजमाता जिजाऊ या आदर्श माता होत्या. आजही त्यांच्या व्यक्तिमत्वातून महिला, युवक सर्वांनाच प्रेरणा मिळत असते. जिजामातांनी शिवाजी महाराजांना वैचारिक शिकवण दिली. त्यामुळे शिवाजी महाराज रयतेचे राजे होऊ शकले.

जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे. सध्या कलियुग सुरू आहे. त्यामुळे अवती भोवती अनेक चुकीच्या घटना, अत्याचाराच्या घटना या सातत्याने आपल्या कानावर पडत असतात. त्याकाळी महाराजांच्या अधिपत्त्याखालील राज्यामध्ये अशा घटना घडल्या तर जबर शिक्षा केली जायची. रयतेच्या कल्याणाचा विचार केला जायचा. हाच कल्याणाचा व्यापक विचार समोर ठेवत कार्य करण्याची गरच असल्याचे यावेळी काळे म्हणाले.

 

Post a Comment

Previous Post Next Post