स्मायलिंग अस्मिताच्या वतिने ४२४ व्या जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन
। अहमदनगर । दि.12 जानेवारी । अहमदनगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालय येथे स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊंच्या ४२४ व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते; त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब पवार म्हणाले, की जिजाऊ म्हणजे त्याग आणि धैर्याचे सर्वोच्च शिखर होय.
इथल्या भुमिपुत्रांसाठी, कुणब्यांसाठी जिजाऊंनी स्वत:च्या संसाराचा त्याग करत स्वराज्य निर्माणासाठी आयुष्य खर्च केले. आज कोरोणाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यावेळी जिजाऊंनी केलेल्या धिरोदात्त वाटचालीच्या अनुकरणाची गरज समाजाला आहे.
यावेळी गडवाट परिवाराचे अभिजित दरेकर यांनी सांगितले, की सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करत स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले ही खरोखर उल्लेखनीय बाब आहे.
सध्या तरुणांनी जिजाऊंच्या पुस्तकाचे वाचन केले पाहिजे त्यातून स्वत:वर आलेला मानसिक ताण कमी होईल आणि उज्ज्वल भविष्यासाठी, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी जिजाऊंचे वाचन प्रेरणादायी ठरेल.
यावेळी मुन्ना चमडेवाले आणि महापालिकेचे उद्यान विभाग प्रमुख मेहेर लहारे यांनी देखील आपापली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय शेळके यांनी केले तर आभार स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी मानले.