आदर्श व प्रेरणा यशाचा राजमार्ग-एन. बी. धुमाळ


। अहमदनगर । दि.12 जानेवारी ।  सर्वगुणसंपन्न कोणीच नसतो पण प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले गुण असतात थोरामोठ्या व्यक्तींचे विचार आपण घ्यायचे असतात. आपले आदर्श निवडले पाहिजे .त्यांचे चांगले गुण आत्मसात करून युवकांनी स्वयंप्रेरित होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन लाईफ लाईन उद्योगसमूहाचे अध्यक्षएन. बी. धुमाळ यांनी केले ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आयोजित स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते .

धुमाळ पुढे म्हणाले की स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माची पताका संपूर्ण जगासमोर मांडली .त्यांचे उत्तुंग कार्य युवकांना आशादायी व प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो तसेच राजमाता जिजाऊ आऊसाहेब या तमाम मातृ शक्तीच्या प्रेरणास्थान आहे व महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. अवघ्या जगाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी बाल वयात संस्काराचे धडे देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय कमी वयात स्वराज्याचे स्वप्न पाहण्यासाठी प्रेरित केले आहे, 

हे स्वराज्य स्वतःसाठी नव्हते तर रयतेसाठी आणि त्यांच्या हक्काचे स्वराज्य मिळवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सुख आणण्यासाठी होते असे ते म्हणाले अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हॉटेल सुवर्ण प्राईड चे अधिकारी श्री नवनाथ औटी उपस्थित होते .अध्यक्षस्थानावरून बोलतांना श्री गाडेकर यांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांचे कार्य आजही आपल्या समोर आदर्श घेण्यासारखे आहे .या महापुरुषांच्या विचारांचा वारसा आपण पुढे चालवणे आवश्यक आहे असे सांगीतले.

यानिमित्त एन.बी धुमाळ लिखीत यशस्वितेचासुवर्ण मंत्र हे पुस्तक जिल्ह्यातील 250 ग्रंथालयांना वाटण्यासाठी विनामूल्य दिल्याबद्दल त्यांचे आभार श्री. गाडेकर यांनी मानले. स्वागत व प्रास्ताविक ग्रंथालय निरीक्षक  रामदास शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन  शैलेश घेगडमल यांनी मानले .याप्रसंगी रोहित भिंगारदिवे, संपत दरवडे ,अविनाश शिरसाट आदींसह वाचक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post