। नागपूर । दि.10 जानेवारी । प्रतिबंधित नायलॉन मांजावर विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई सुरू आहे. यात नागपूरमध्ये बारा विक्रेत्यांवर गुन्हे शाखेने गुन्हे दाखल करून ४०० नायलॉन मांजा बंडल जप्त केले आहे.
नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघाताची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूने अवैद्य पद्धतीने नायलॉन मांजा विक्री देखील शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे, नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
नंतर नागपूर गुन्हे शाखेने गेल्या २८ दिवसात शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ३२ ठिकाणी छापामार कारवाई करून १६ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर नागपूर गुन्हे शाखेने गेल्या २८ दिवसात शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ३२ ठिकाणी छापामार कारवाई करून १६ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Tags:
Maharashtra