। मुंबई । दि.10 जानेवारी । दारूची दुकाने किंवा वाईन शॉप वर गर्दी होत असेल तर, गर्दी टाळण्यासाठी त्या ठिकाणी निर्बंध लावण्याच्या काहीच अडचणी नाहीत असा इशारा आरोग्यमंत्री टोपे यांनी दिला आहे.
टोपे म्हणाले की मंदिर किंवा धार्मिक स्थळी एकावेळी जास्त गर्दी करू नये. नव्या नियमावलीनुसार मंदिर बंद केले नाहीत. पण सामाजिक अंतर पाळून एकावेळी 40 ते 50 च्यावर संख्या असू नये. प्रार्थनास्थळांवर गर्दी न करण्याचे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.
तसेच लागू होणाऱ्या निर्बंधांना नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती देखील राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात सध्या अनेक दारु विक्री करणारी दुकाने व शॉपवर गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Tags:
Maharashtra