सनईच्या सुरात कोरठण खंडोबाला यात्रे निमित्त लागली हळद


। अहमदनगर । दि.10 जानेवारी । लाखो भाविकांचे कुलदैवत श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या राज्य स्तरीय बवर्ग तीर्थक्षेत्रावर पौष षष्टी मुहूर्तावर प्रतिकात्मक वार्षिक यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने शनिवार दि.8 जाने 2022 रोजी सकाळी ठिक 10 वा. पारंपरिक रितीरिवाजानुसार साधेपणाने फक्त 9 महिलांच्या हस्ते देवाला हळद लावण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला.

सकाळी 9 वा ग्रामस्थ अनिल वाघमारे, आशिफ पटेल, रंगनाथ वाळुंज, यांनी देवाला मांडवडहाळे आणले. कोरोना निर्बंध लागु असल्याने आणि यात्रा उत्सव रद्द असल्याचे परंपरा जतन करण्यासाठी 9 महिलांच्या हस्ते मंदिर आवारात जात्यावर पारंपरिक ओव्या गात देवाची हळद दळन्यात आली.

खंडोबाला हळद लावण्याचा प्रथम मान परीट समाजाला असून सौ हिराबाई वाघमारे या परीट महिलेच्या हस्ते देवाला प्रथम हळद लावण्यात आली. त्यानंतर सौ शोभा चौधरी, सौ सुभद्रा आहेर, सौ सरूबाई वाळुंज, सौ जयवंताबाई सुंबरे, सौ नंदा ढोमे, सौ विमल घुले, सौ लता वाळुंज, सौ तारा पुंडे, सौ सीमा वाळुंज या महिलांच्या हस्ते देवाला हळद लावली.

सनईच्या मंगल सुरात देवाला हळद लावण्याचा पारंपरिक कार्यक्रम प्रतिकात्मक भक्तिमय वातावरणात पार पडला या वर्षी 17.1.2022 ते 19.1.2022 पौष पोर्णिमा यात्रा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द असल्याने देवाची हळद गावातून मिरवण्यात आली नाही.

यात्रा काळात 3 दिवस दर्शनासाठी मंदिर बंद राहणार असून मंदिराकडे येणारे रस्ते पोलिसांकडून बंद ठेवण्यात येणार आहेत. यात्रा काळात दुकानदारांनी दुकाने लाऊ नये व भाविक भक्त यात्रेकरूनी मंदिर दर्शनासाठी येऊ नये असे अवाहन देवस्थान व प्रशासनासनाकडुन करण्यात आलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post