। मुंबई । दि.13 जानेवारी । महाराष्ट्र दुकाने व अस्थापना अधिनियमातील पळवाटेचा फायदा घेऊन 10 पेक्ष कमी कामगार असलेल्या दुकानांकडून मराठी पाट्या लावण्यास विरोध दर्शविला जात होता. याला चाप बसवण्यासाठी या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठकीत दुकान किंवा आस्थापना मोेठे असो वा छोटे, त्यावर मराठी पाटी लावयलाच हवी, असा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत आज घेण्यात आला.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अनिनियम -2017 मध्ये 10 पक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकान नियमातून पळवाट असल्याने आढळून आले, अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपायोजना करण्याची मागणीही होत होती. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत या विषावर चर्चा करण्यात आली. सर्वच दुकानांवर मराठी पाट्या असायलाच हव्यात, यावर मंत्रिमंडळत्तचे एकमत झाले व त्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय शिक्कामोर्तब कण्यात आला.
लहान अक्षरात लिहिता येणार नाही
मराठी भाषामंत्री सुभाष देसाई म्हणाले, मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व अस्थापना विनियम अधिनियम -2017 मध्ये सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानांवरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यामध्ये 10 पेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता, यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकानांवरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठी-देवनागरी लिपीतील अक्षरे दुसर्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली असल्याची माहिती देसाई यांनी दिली.