। सातारा । दि.13 जानेवारी । वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात मनाई असतानाही सातारा तालुक्यातील अंबवडे बुदु्रक येथे कबड्डी स्पर्धचे आयोजन करण्यात आले.याप्रकरणी पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांसह चार सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
अध्यक्ष रामदास धर्माजी जाधव, सदस्य जीवन विष्णू पवार, सदस्य काशिनाथ शंकर पाटील, सदस्य महेश सीताराम लोहार (सर्व रा.अंबवडे बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांचे नावे आहेत. याबाबत हवालदार रामचंद्र अहिवळे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अंबवडे येथील रंगराव विद्यालयाच्या क्रीडांगणावर कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या कोरोनामुळै अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यास जिल्हाधिकार्यांनी मनाई केली आहे. असे असतानाही या स्पर्धा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तत्काळ तेथे पोहचून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने उल्लंघन केल्याप्रकरणी अध्यक्षांसह सदस्यांवर गुन्हा दाखल केला.
Tags:
Maharashtra