राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

 । मुंबई । दि.12 जानेवारी ।  राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राष्ट्रासाठी त्यागाची आणि जगण्याची प्रेरणा असणा-या राजमाता जिजाऊ आणि जगभरातील युवकांना जगण्याचा आणि जिंकण्याचा मूलमंत्र देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव (प्र.सु.र.का.)  इंद्रा मालो यांनीही यावेळी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण करून वंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post