। नाशिक । दि.30 जानेवारी । महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयातील विद्युत भवन येथे आज रविवारी ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. यावेळी अधिक्षक अभियंता(पायाभूत आराखडा) संजय खंडारे, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने,
जनसंपर्क अधिकारी विकास आढे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत चव्हाण व जितेंद्र महाजन, सहाय्यक अभियंता मनोज गायधनी व राम इप्पर, मंगेश जाधव यांच्यासह कर्मचारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले
Tags:
Maharashtra