कृषीपंप चोरणार्‍या चोरट्यास अल्पवयीन साथीदारासह अटक

 


। अहमदनगर । दि.30 जानेवारी । जामखेड तालुक्यातील शेत जमिनीतील विहिरीवरून कृषि पंप चोरणार्‍या चोरट्यास त्याच्या एका अल्पवयीन साथीदारासह जामखेड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरलेले चार कृषीपंप जप्त केले.

जामखेड पोलिस ठाण्यात दाखल कृषीपंपांच्या चोरीच्या गुन्ह्यांबाबत गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे तपास करीत होते. तपासा दरम्यान हा गुन्हा बाबा दयानंद खाडे याने केला अशी माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी बाबा दयानंद खाडे (वय 21, रा. बाळगव्हाण शिवार) याचा त्याच्या गावात व मित्राकडे शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.

 पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. हा गुन्हा करतेवेळी भाऊ योगेश खाडे व आरोपी बाबा खाडे याचा अल्पवयीन मित्र हे त्याचे साथीदार असल्याचे सांगितले. पोलिसांनी बाबा खाडे व त्याच्या अल्पवयीन मित्राकडून गुन्ह्यातील मुद्देमाल 4 कृषीपंप हस्तगत केले.

Post a Comment

Previous Post Next Post