करकोळ कारणातून तरुणाला मारहाण,दोघांविरुध्द गुन्हा


। अहमदनगर । दि.30 जानेवारी । किरकोळ कारणातून झालेल्या वादातून दोघांनी तरुणाला खाली पाडून दगडाने मारहाण केली. या मारहाणीत योगेश पुंडलीक जावळे (वय 28, रा. मळ्याची वाडी, तारकपूर) हा तरूण जखमी झाला आहे. ही घटना सावेडी परिसरातील तारकपूर बसस्थानकाच्या मागील मळ्याची वाडी परिसरात घडली.

भारत पंडित यांनी योगेश जावळे यांना शिवीगाळ केली होती. याविषयी शुक्रवारी सकाळी योगेश जावळे त्यांची मावशी विद्या भारत पंडित यांना सांगत असताना ते भारत पंडित याने ऐकले. तेव्हा भारत याने पुन्हा योगेश यास शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या योगेशला भारत व वर्षा यांनी खाली पाडून दगडाने मारहाण करत जखमी केले.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी योगेश पुंडलिक जावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारत माणिक पंडित (रा. मळ्याचीवाडी, तारकपूर) व वर्षा महागडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पुणे) यांच्याविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार शिरसाठ करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post