कोयत्याने वार करून भाजी विक्रेत्यास तिघांनी लुटले


। अहमदनगर । दि.10 जानेवारी । भाजी-पाला खरेदीसाठी मार्केटयार्डमधील भाजी मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास चाललेल्या शहरातील माजी विक्रेत्यास तिघा चोरट्यांनी अडवून कोयत्याने वार करत त्यांना लुटल्याची घटना नगर शहरात सोमवारी (दि. 10) पहाटे 5.30 च्या सुमारास कोटगल्लीतील दादा चौधरी शाळेसमोर घडली,

या घटनेत सतीश नारायण तरोटे (वय 59, रा.सातभाईगल्ली, चितळेरोड) हे गंभीर जखमी झाले आहेत. तरोटे यांचा भाजी 1 विक्रीचा व्यवसाय असून ते नेहरू मार्केट परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भाजी विक्री करीत आहेत.

दररोज पहाटे मार्केटयार्ड मधील भाजीपाला मार्केटमध्ये जावून भाजी खरेदी करणे व दिवसभर चितळेरोडवर भाजीची विक्री करणे उर्फ हा त्यांचा दिनक्रम आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी पहाटे 5.30 च्या सुमारास ते घरुन भाजीपाला आणण्यासाठी मोपेडवर निघाले.

कोर्टगल्लीतील दादा चौधरी शाळेसमोर पाठीमागून अ‍ॅक्सेस मोपेडवर तीन युवक आले व त्यांनी तरोटे यांना पाठीमागून धडक देत रस्त्यावर खाली पाडले. त्यावेळी त्यांच्यात आणि त्या युवकांमध्ये बाचाबाची झाली.

या दरम्यान एका जणाला त्यांनी पकडून ठेवले.. त्या दरम्यान एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारुन चोरली, तसेच ते पकडून ठेवलेल्या युवकाला सोडत नसल्याने त्यांच्या दोन्ही हातावर कोयत्याने वार करण्यात आले.

त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या संधीचा फायदा घेऊन चोरटे तेथून पसार झाले. याबाबत तरोटे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भा.दं.वि.क. 394, 397 अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post