। औरंगाबाद । दि.10 जानेवारी । राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय जिजाऊ महोत्सवाचे आयोजन बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टी येथे दरवर्षी मराठा सेवा संघातर्फे केले जाते. परंतु यावर्षी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे, शासनाच्या आदेशानुसार, बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिजाऊ महोत्सवासाठी फक्त पन्नास लोकांची उपस्थितीची परवानगी दिली असल्यामुळे गतवर्षी प्रमाणेच याही वर्षी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडसह विविध फेसबुक पेज वरून हा सोहळा लाईव्ह करण्यात येणार आहे.
त्यामुळे जगभरातील जिजाऊ प्रेमींना या सोहळ्याचा लाभ घेता येणार आहे. आपण आपापल्या घरी राहूनच हा सोहळा साजरा करावा असे आवाहन संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रवेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.
Tags:
Maharashtra