। अहमदनगर । दि.10 जानेवारी । नगर पुणे रोड वरील केडगाव मधील लोंढे मळा येथे लावलेली तीस हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी कार ( क्रमांक एम एच 12 बी व्हीं 1367 ) कोणीतरी अज्ञात चोराने बनावट चावीने सुरू करून चोरुन नेली. ही घटना केडगाव येथील लोंढे मळा येथे घडली.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी रमेश गंगाधर काकडे ( वय 41 राहणार काकडे मळा, केडगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कायदा कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार गाजरे करीत आहे.
Tags:
Crime