। अहमदनगर । दि.10 जानेवारी । नेवासा तालुक्यात चांदा जाणार्या रस्त्यावर कांगोणी शिवारात शिंगणापूर फाट्याजवळ पाटाच्या कडेला काटवनात सहाजण दबा धरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना लपून बसल्याची माहिती शिंगणापूर पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तातडीने हालचाल करीत शिंगणापूर फाट्याजवळ छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तिघा आरोपींना पकडले तर तीन आरोपी अंधारात पळून गेले. रात्री 9.45 वा. ही कारवाई केली.
पकडलेल्या आरोपींजवळून लाकडी दांडे, लाल मिरचीची पूड, लोखंडी गज मिळून आला. पोलिस नाईक फुलमाळी यांच्या फिर्यादीवरुन अमोल जालिंदर काळे (वय 26, रा. राजेवाडी, जामखेड), खंडू उर्फ किरण रावसाहेब काळे (वय 26, रा. मिलिंदनगर, जामखेड),
विकी मिलिंद घायतडक (वय 31, रा. आरोळे वस्ती, जामखेड) व फरार तीन अशा सहा जणांविरुद्ध शिंगणापूर पोलिसात दरोड्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास शिंगणापूर पोलिस करीत आहे.
Tags:
Ahmednagar