। सांगली । दि.17 जानेवारी । बैलगाडी शर्यतीवर बंदी उठवण्यात आल्यानंतर राज्यात प्रथमच सांगली जिल्ह्यातील भोसे येथे यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यत ही विनापरवाना भरवल्याप्रकरणी सात जणांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा...राहात्यामध्ये कांद्याला रविवारी मिळाला काय भाव
याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ५ जानेवारी भोसे येथील यल्लम्मा यात्रेनिमित्त गावातील सरकारी दवाखान्याच्यामागे सामाजिक वनीकरणाच्या मोकळ्या जागेत बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि अन्य सर्व नियम निकषांचे पालन न करता शर्यत आयोजित करण्यात आली.
हे देखील वाचा...तरुणीने मोबाईलवर गोड बोलून घातला लाखाला गंडा
याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दोन वेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये एक गुन्हा हा प्राण्यांचर क्रूरतेने छळवणूक करण्यास दुसरा गुन्हा हा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करण्याच्या गुन्ह्याचाही समावेश आहे.
हे देखील वाचा...खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा : कृषिमंत्री
दरम्यान, राज्यात शर्यती भरण्यास कोर्टाने मान्यता दिली असली तरी सध्या ओमायक्रॉनमुळे राज्यात निर्बंध घालण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लघंन होताना दिसत आहे.
हे देखील वाचा...हॉटेलचा नाष्टा करताना चोरट्यांनी डाव साधला ; पाच लाखाची बॅग लांबवली