तरुणीने मोबाईलवर गोड बोलून घातला लाखाला गंडा


। अहमदनगर । दि.17 जानेवारी । श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात राहणार्‍या राऊत नावाच्या तरुणाच्या मोबाईलवर आराध्य शर्मा असे नाव सांगणार्‍या तरुणीने तिच्याजवळील 8948260233 या नंबरवरुन कॉल केला व ती तरुणी मधुर आवाजात म्हणाली की,

क्रेडीट कार्ड आयसीआयसीआय डिपार्टमेंटमधून बोलते असे सांगून विश्वास संपादन करुन तुमचे क्रेडीट कार्डचे लिमीट वाढविण्यासाठी व्हेरिफिकेशन कॉल आहे, असे सांगून तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी सांगा अशी बतावणी करुन 99 हजार 274 रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणी औदुंबर सुभाष राऊत (रा.बेलापूर) याने सायबर पोलिसात तक्रार दिल्यावरुन आराध्य शर्मा नाव सांगून मोबाईलवर बोलणार्‍या तरुणीविरुद्ध भा.द.वि. कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. असून सायबर पोलिस पुढील तपास करीत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post