। अहमदनगर । दि.16 जानेवारी । हॉटेलवर नाष्टा करताना चोरट्यांनी डाव साधला व प्रवाशाची 5 लाख रकमेची बॅग लांबविली. ही घटना दि. 14 रोजी सायंकाळी सहा वाजता नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीचा पूल परिसरातील हॉटेल लिलीयमसमोर घडली. बसमध्ये पैशांची बॅग ठेवून नाष्टा करायला जाणे प्रवाशाला चांगलेच महागात पडले.
हे देखील वाचा...महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी विचारच प्रेरक : उपमुख्यमंत्री अजित पवार
हॉटेलवर नाष्टा करताना ट्रॅव्हल्स बसमध्ये ठेवलेली 5 लाख रकमेची बॅग चोरटयाने चोरून नेल्याप्रकरणी अनिलकुमार दिगंबरराव धारूळै (वय 52, रा. सातारा परिसर, औरंगाबाद) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
हे देखील वाचा...‘मविआचा मराठी पाट्यांचा पुळका बेगडी’ : चित्रा वाघ
धारूळै हे ट्रॅव्हल्स बसमधून (एमएच 34 बीजी 7077) प्रवास करीत होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान ही बस नाष्टयासाठी औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीच्या पुलाजवळील हॉटेल लिलीयमजवळ थांबली.बसमधून बहुतांश प्रवासी चहापाणी व नाष्ट्यासाठी खाली उतरल्याने धारूळै हेही नाष्टयासाठी बसमधून उतरले.
हे देखील वाचा...दुकानांवरील पाट्या मराठीत करा... अन्यथा गाठ मनसेशी...
त्यांच्यासह अन्य प्रवासी हॉटेलमध्ये नाष्टा करीत असताना याचदरम्यान चोरट्यांनी बसमध्ये ठेवलेली त्यांची 5 लाख रक्कम असलेली बॅग चोरून नेली. नाष्टा करून पुन्हा प्रवासासाठी म्हणून बसमध्ये ते परतल्यावर बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी व अन्य प्रवाशांनी बसमध्ये तिचा शोध घेतला,
हे देखील वाचा...दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन क्रॅश कोर्सचा शुभारंभ
पण बॅग व त्यातील पैसे चोरी गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाणे गाठत या घटनेची फिर्याद दिली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक गांगर्डे करीत आहेत. दरम्यान, पाळत ठेवून ही चोरी झाली असावी,असा संशय व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा...पल्सर झाडाला धडकून दोन ठार
त्यामुळे प्रवासात पैसे समवेत असलेल्यांनी जास्त सावधगिरी बाळगण्याची गरजही व्यक्त होत आहे. चहा-पाणीनाष्टा वा स्वच्छतागृहात जाताना पैशांबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकताही व्यक्त होत आहे.
हे देखील वाचा...170 रुग्णांना डिस्चार्ज तर बाधितांच्या संख्येमध्ये वाढ...वाचा सविस्तर