पेट्रोल देण्यासाठी उशीर झाल्याने पेट्रोलपंप कर्मचार्‍याला मारहाण




। अहमदनगर  । दि.08 जानेवारी । पेट्रोल पंपावर पेट्रोल देण्यास उशीर झाला याचा राग मनात धरुन काही तरुणांनी राडा घातला. पेट्रोल पंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍याला मारहाण केली. सदरची घअना ही राहता तालुकयात बाभळेश्‍वर ते लोणी रोडवरील एका पेट्रोल पंपावर घडली आहे.

याप्रकरणी या कर्मचार्‍यांनी लोणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पेट्रोल पंपावर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या युवकास पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांकडून पेट्रोल देण्यास उशीर झाला.

या कारणावरुन त्या युवकांमध्ये व पेट्रोल देणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यावसन हाणमारतीत झाले. रात्रीच्या वेळी या झालेल्या घटनेममुळे रोडवरील नागरिकांना काय झाले याची कल्पना न आल्यामुळे थोडावेळ या परिसरात गोंधळ उडाला होता.

किरकोळ कारणावरुन झालेल्या हाणामारीमुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या युवकांमध्ये असा हाणमारीचा प्रसंग प्रथमच घडला.या घटनेची माहिती काही नागरीकांनी पोलिसांना दिल्यानंतर लोणी येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी वाद हा रात्री सामंजस्याने मिळविण्याचा प्रयत्न केला आणि तरुणांना समज दिली.

Post a Comment

Previous Post Next Post