कोरठण खंडोबा तीर्थक्षेत्रावर गगनगिरी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न


। अहमदनगर । दि.31 जानेवारी । लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगावरोठा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या राज्यस्तरीय "ब"वर्ग तीर्थक्षेत्रावर पौष द्वादशी परमपूज्य गगनगिरी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. सकाळी सात वाजता खंडोबा महाअभिषेक पूजा आरती श्री विकास मुंढे व सौ चांगुनाबाई मुंढे आणि श्री बन्सी ढोमे व सौ लताबाई ढोमे यांच्या हस्ते झाली. नंतर गगनगिरी महाराज मूर्ती मंदिरात होमहवन,पूजा,अभिषेक महाआरती झाली.

सकाळी १० वा. गगनगिरी महाराज प्रतिमेची पालखीतून मिरवणूक कोरठन गडाला प्रदक्षिणा करून मंडपात विराजमान झाली मिरवणुकीच्या मोजक्या भाविक ,भक्त, ग्रामस्थ उपस्थित होते महाराजांच्या प्रतिमेची महाआरती सभामंडपात झाल्यानंतर  जनार्दन महाराज मुंडे यांचे संत चरित्रावर भक्तिमय प्रवचन झाले.

दुपारी १२ वाजता श्री शिवाजी विठोबा ढोमे यांच्या वतीने सर्वांना पंगत महाप्रसाद देण्यात आला. कोरोना नियमांचे पालन करून गर्दी न करता देवस्थानतर्फे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष एडवोकेट पांडुरंग गायकवाड,माजी उपाध्यक्ष रामदास मुळे,उपसरपंच महादेव पुंडे,विश्वस्त बन्सी ढोमे,अमर गुंजाळ,देविदास शिरसागर,तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले, ग्रामपंचायत सदस्य तानाजी मुळे,भगवान भामरे जय मल्हार विद्यालयाचे शिक्षक,कर्मचारी,भाविक भक्त,ग्रामस्थ मोजक्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post