कुराश असोसिएशन महाराष्ट्र ची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न


। पुणे । दि.31 जानेवारी । आंतरराष्ट्रीय कुराश असोसिएशनचे प्रथम  उपाध्यक्ष व भारतीय कुराश असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व  माजी केंद्रीय मंत्री जगदीश जी टायटलर यांच्या पुढाकाराने  कुराश असोसिएशनची स्थापना भारतात झालेली असून  संपूर्ण भारतात  खेळाबद्दल पोषक वातावरण निर्मिती करून खेळाडूंना प्रोत्साहन देवून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे सक्षम नेतृत्व करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याचे उदिष्ट ठेवून कार्यरत आहे.

याच उद्दात भावनेतून महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी रणजित दादा जगताप यांनी स्वत:च्या खांद्यावर घेवून सक्षमतेने व प्रभावीरीत्या पार पाडीत असून त्यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे येथे कुराश असोसिएशन महाराष्ट्र ची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
      
महाराष्ट्र ही भूमी खेळाडूंची कर्मभूमी असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विविध खेड्यांमध्ये अत्यंत गुणी व कष्टाळू  मुले उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा गुणवान खेळाडूंना व्यायाम शाळा , खेळाची मैदाने व आवश्यक असणारी साधने पुरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी अध्यक्ष रणजित दादा जगताप यांनी केले.

तसेच अशा खेळाडूंना शासन स्तरावरून आवश्यक असणार्‍या सर्व ती मदत व सहकार्य तत्परतेने मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबध्द  असल्याचे प्रतिपादन कुराश असोसिएशनचे उपाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांनी केले.

यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे, सेक्रेटरी  शिवाजी साळुंखे, खजिनदार अमोल भाऊ शिंदे, युवक मराठा महासंघाचे प्रदेश संघटक करणसिंह जी रणवीर, पश्चिम महाराष्ट्र सचिव गोरख भाऊ कामठे आदी इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post