। अहमदनगर । दि.31 जानेवारी । औरंगाबाद रोडवरील लक्ष्मीनगर सोसायटीमधील श्रद्धा खिलारी या सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या सेट परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परिक्षेत सौ.श्रद्धा खिलारी पर्यावरण शास्त्र विषयात उत्तीर्ण होऊन ६४ टक्के गुण मिळवले.
अत्यंत अवघड असणाऱ्या या परिक्षेत उत्तीर्ण होणार्यांची संख्या कमी असते. अशा परिस्थितीत श्रद्धा यांनी मिळवलेले यश नेत्रदिपक असेच आहे. श्रद्धा यांना आई सुरेखा - वडील चंद्रभान हापसे यांचे तर पती अभिषेक, सासू कौशल्या व सासरे एकनाथ खिलारी यांचे मार्गदर्शन मिळाले. डॉक्टरेट पदवी पूर्ण करुन शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, असे श्रद्धा यांनी यावेळी सांगितले.
Tags:
Ahmednagar