। अहमदनगर । दि.23 नोव्हेंबर । शाळकरी मुलाचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील येळपणे येथे घडली. अभिषेक बाळू लकडे (वय 11 ) असे मृत मुलाचे नाव आहे.
येळपणे गावातील ठाणगे वाडी येथील अभिषेक हा विहिरीच्या कडेला असलेल्या बोराच्या झाडाला बोरे काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
तो बराच वेळ झाला तरी घरी न आल्यामुळे त्याचा शोध घेतल्यामुळे विहिरीच्या कडेला त्याची चप्पल दिसून आली व संशय आल्यामुळे बांबूच्या सहाय्याने विहिरीत पाहिले असता त्याचा मृतदेह आढळून आला.
सोमवारी दुपारी साडेबारा वाजता अभिषेकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिषेक श्री.खंडेश्वर माध्यमिक विद्यालय येळपणे येथे सहावीत शिकत होता. तो हुशार होता व त्याचा स्वभाव चांगला होता. अभिषेकचे वडील हे शेती करतात.
त्याच्या आईचे दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन येळपणेचे सरपंच किरण धावडे,अनिल वीर, आबा पवार, भाऊसाहेब पवार,प्रा.लकडे, खंडेराव शिंदे, पवार, आजी-माजी सरपंच आदींनी लकडे कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
Tags:
Ahmednagar