। अहमदनगर । दि.23 नोव्हेंबर । जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीतील बळींची संख्या चौदा झाली आहे. 6 नोव्हेंबर रोजी या अग्निकांडात 11 जणांचा मृत्यू झाला. काही दिवसांनी आणखी एका रुग्णाचा, तर चार दिवसांपूर्वी चौदावा बळी गेला होता.
इतर रुग्णांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एका महिलेचा सोमवारी मृत्यू झाला, एका रुग्णावर उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले आहे. तर इतर दोघांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याच अग्नीकांडाच्या घटनेत रेल्वे स्थानकावर सापडलेल्या एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्याची ओळख अद्यापही पटलेली नाही. त्यामुळे त्याच्याविषयी कोणाला माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी केले आहे.