अजित पवार यांनी मास्कवरून रोहित पवार आणि उपस्थित लोकांना कानपिचक्या लगावल्या

। पुणे । दि.14 नोव्हेंबर । कर्जत जामखेडला गेलो असता मला तिकडे कोणीच मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. आमच्या रोहितने पण मास्क घातले नव्हते, शेवटी मीच न राहून रोहितला म्हटले शहाण्या तु या मतदारसंघाचा आमदार आहेस, तुच जर मास्क नाही घातलेस तर मी लोकांना मास्क वापरण्यास कसे सांगू? मी भाषण करताना कधीच मास्क काढत नाही, आणि तिथे मला एकानेही मास्क घातलेले दिसले नाही, असे म्हणत अजित पवार यांनी मास्कवरून रोहित पवार आणि उपस्थित लोकांना कानपिचक्या लगावल्या आहे. ते बारामती तालुक्यातील धुमाळवाडीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र आता रुग्ण कमी होत असल्याने शासनाकडून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. परंतु या सूटीचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. देशातून अद्याप कोरोना हद्दपार झालेला नाही. त्यामुळे आपली एक चूक देखील महागात पडू शकते. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम पाळा आणि तिसरी लाट टाळा असे पवार यांनी म्हटले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post