। यूएई । दि.14 नोव्हेंबर । न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही केन विल्यमसनच्या खांद्यावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व एरॉन फिंच करणार आहे. हा सामना जिंकून वर्ल्ड कप कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ऑस्ट्रेलिया टी 20 चा नवा विश्वविजेता ठरला आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंचने गोलंदाजी निवडली. जो निर्णय ऑसीसच्या गोलंदाजांनी अगदी बरोबर असल्याचं दाखवत अप्रतिम गोलंदाजी केली. न्यूझीलंडच्या गप्टीलने धिम्यागतीने धावा करत 28 रन केले.
पण केनने संपूर्ण डाव सांभाळत 48 चेंडूत 85 धावा केल्या. त्याने या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजास खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे न्यूझीलंड 172 धावा करु शकला.
बहुचर्चित असा टी20 विश्वचषक 2021 अखेर संपला आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला 8 विकेट्सनी मात दिली. ऑस्ट्रेलियाची बोलिंग आजच्या सामन्यात कुठेतरी कमकुवत वाटली होती. पण फलंदाजीने ही कसर भरुन काढत ऑस्ट्रेलियाने एक मोठा आणि महत्त्वाचा विजय मिळवला आहे. इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा संघ टी 20 विश्वचषक जिंकला आहे.