। मुंबई । दि.17 नोव्हेंबर । ब.मो.पुरंदरे यांच्या अस्ती कोणत्याही गडावर संभाजी ब्रिगेड विसर्जित होऊ देणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी दिला आहे.
नुकतेच ब.मो.पुरंदरे यांचे निधन झालेले आहे. त्यांच्या अस्ती एकूण अकरा गडावर विसर्जीत करण्यासंदर्भात बातमी येत आहे. ज्या ब.मो. पुरंदरेंनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे, यांची लिखाणाच्या माध्यमातून बदनामी केलेली आहे.
त्या ब.मो.पुरंदरेच्या अस्ती संभाजी ब्रिगेड कोणत्याही गडावर विसर्जीत होऊ देणार नाही. तसा प्रयत्नही कोणी करू नये. तसा प्रयत्न केल्यास, संभाजी ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने धडा शिकवेल. त्यांचा गडावरून कडेलोट ही होऊ शकतो. यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, यास सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असे डॉ.शिवानंद भानुसे यांनी म्हटले आहे.
Tags:
Maharashtra