। अहमदनगर । दि.17 नोव्हेंबर । प्राध्यापक तथा फिजिकल डायरेक्ट डॉ.संतोष भुजबळ (D.litt) यांची राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे राष्ट्रवादी भवन अहमदनगर येथे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके पाटील, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, काकासाहेब तापकीर, शरद मुळे व आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथील प्राध्यापक तथा फिजिकल डायरेक्ट डॉ.संतोष भुजबळ (D.litt) यांची निवड राष्ट्रवादी शिक्षक सेलचे प्रांताध्यक्ष.विक्रम काळे व राष्ट्रवादी शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.प्रफुल्ल राऊत यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रात असलेल्या डॉ.संतोष भुजबळ यांच्या अनुभवांचा व कौशल्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी निश्चित फायदा होईल.