एसटी संपावरून चित्रा वाघ यांचे अजितदादांना पत्र
। मुंबई । दि.17 नोव्हेंबर । राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरू आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात वाघ यांनी एसटी कर्मचार्यांचे आत्महत्या सत्र थांबवण्यास पुढाकार घ्यावा. त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीवर त्वरित तोडगा काढावा. अशी विनंती केली आहे.
हे देखील वाचा...अभिनेता सुशांत राजपूतच्या कुटुंबावर सावट
दादा, आपण अत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातले तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे
आत्ताही आपण या प्रकऱणात लक्ष घातले तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री
वाटते. असा विश्वास अजित पवारांबद्दल चित्रा वाघ यांनी व्ये केला आहे. आंदोलन तीव्र होत चालले आहे. इच्छा असेल तर मार्ग निघतोच; पण शिवसेनेचे मंत्री अनिल परब आडमुठेपणा करत व्हिलनच्या भूमिकेत जात आहेत.
हे देखील वाचा...महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार
एसटी विलीनीकऱणाचा मुद्दा काढला की बॅलन्सशीट पुढे केली जातेय. सुमारे 35 पेक्षा जास्त एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केली. त्यांची मुलं पोरकी झालीत. पत्नी विधवा झाल्या आहेत. ही जीवितहानी कशी भरुन येणार? माणसाच्या जीवाची किंमत बॅलन्सशीटवर ठरवली जाणार का? आयुष्याच्या बॅलन्सशीटमध्ये जगणे महाग आणि मरण स्वस्त झाले आहे.
हे देखील वाचा...वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दादा, आपण अत्तापर्यंत ज्या विषयात लक्ष घातलं तो यशस्वीपणे तडीस नेला आहे. त्यामुळे आपण या प्रकऱणात लक्ष घातले तर तो सकारात्मकपणे निकाली निघेल याची मला खात्री वाटते. अजून कोणत्या कर्मचार्याने आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांची मुख्य मागणी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे याची आपण त्वरीत दखल घ्यावी ही अपेक्षा.
हे देखील वाचा...डेहराडूनमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !
*"परमात्म्याची" किमया पहा आपणा सर्वांना "निर्माण" करून स्वतः "अदृश्य" आहे, सर्व पहाण्यासाठी "डोळे" तर दिले पण त्याला पहाण्यासाठी डोळे "बंद" करावे लागतात*
ReplyDelete